पाचोरा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश औंंधकर साहेब यांचा पदोन्नती बदली निमित्त भावपूर्ण निरोप समारंभ संपन्न
अध्यस्थानी न्यायाधिश श्री. निमसे साहेब,न्यायाधिश सौ.बोरा मॅडम उपस्थित होते.

पाचोरा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश औंंधकर साहेब यांचा पदोन्नती बदली निमित्त भावपूर्ण निरोप समारंभ संपन्न
पाचोरा: येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कर्तव्यदक्ष न्यायाधीश माननीय श्री. औंंधकर साहेब यांची पदोन्नतीने अन्यत्र बदली झाल्याने, नुकताच न्यायालयीन कर्मचाऱ्यांमार्फत भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या समारंभास पाचोरा सरकारी वकील सौ.हटकर मॅडम सहाय्यक सरकारी वकील मिलिंद येवले, न्यायालयातील सर्व कर्मचारी वर्ग तर अध्यस्थानी न्यायाधिश श्री. निमसे साहेब,न्यायाधिश सौ.बोरा मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला औक्षण करून उपस्थितांनी न्यायाधीश औंंधकर साहेब यांच्या न्यायदानातील निष्पक्षपाती दृष्टिकोन, कायद्याचे अचूक ज्ञान आणि प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले.
त्यांच्या कार्यकाळात न्यायालयातील कामकाज अधिक सुरळीत आणि गतिमान झाल्याचे मत कु.दक्षता पाटील,श्री.चंदु नाईक,दिपक पाटील,उमेश महाजन,संदिप जगताप,मिलिंद येवले,स्वप्निल पाटील,रविंद्र पाटील, यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधिश श्री.निमसे साहेब,न्यायाधिश सौ.बोरा मॅडम यांनी आपल्या भाषणात न्यायाधीश औंंधकर साहेब यांच्यासोबतच्या सहकार्याचे आणि त्यांनी वकिलांना दिलेल्या आदराचे स्मरण केले. त्यांनी पाचोरा न्यायालयासाठी केलेल्या योगदानाला उजाळा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सरकारी वकिलांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा अनुभव कथन करत त्यांच्याकडून मिळालेल्या अनमोल ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी न्यायाधीश औंंधकर साहेब यांच्या मनमिळाऊ स्वभावाचा आणि मदतीच्या वृत्तीचा उल्लेख करत त्यांच्यासोबत काम करणे किती आनंददायी होते,हे सांगितले.
त्यांनी न्यायाधीश साहेबांना व त्यांच्या सहपरीवार सह स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
आपल्या निरोप समारंभाला उत्तर देताना न्यायाधीश औंंधकर साहेब भावुक झाले होते.
त्यांनी पाचोरा न्यायालयातील सहकाऱ्यांचे आणि वकिलांचे सहकार्य तसेच कर्मचार्यांच्या आदरामुळेच आपण यशस्वीपणे काम करू शकलो,
असे सांगितले. पाचोरा शहरासोबत जोडलेल्या आठवणींचा उल्लेख करत त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीस सर्व कर्मचारी वृंद व पोलिस केसवाच यांना शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण समारंभात एक भावुक आणि आदराचे वातावरण होते. न्यायाधीश औंंधकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमा प्रसंगी न्यायालयीन कर्मचारी एन. ए. मोरे नाना, संदिप भोंडे नाना,अमित दायमा वरीष्ठ लिपिक,उल्हास महाजन,उमेश महाजन, सोनवने,अत्रे,मनोज कापुरे,गोविंदा चौधरी.वाणी,संदिप राठोड,मयुर पाटील,जयकर,सुर्यभान पाटील,सतिष सोनजे,राहुल माळी,नितिन कोळी,शिवदास पाटील,चारूशिला पाटील,रोशनी पाटील,ईश्वर पाटील,नितिन पाटील,कासार,एम.पी.बारी,अविनाश सोनार,सचिन राजपुत,होतीलाल पाटील,अनिल गोधणे,विजय चौधरी,सरकारी अभियोक्ता सौ.मिना सोनवने.पोलिस केसवाच आबा पाटील,विकास सुर्यवंशी,राजु पाटील,दिपक पाटील,सौ.रूपाली पाटील,यांच्या सह ईत्यादी उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन भडगाव न्यायालाचे कर्मचारी अभिजीत दायमा यांनी केले.